सत्तापेच कायम ! राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवल्या ‘या’ अटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थानेचा पेच अजूनही तसाच आहे. अखेर काल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेच्या समीकरणाची खलबतं सुरु आहे. परंतू या सत्तावाटपात देखील नवा तिढा निर्माण झाला आहे. पदांच्या समसमान वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना भाजपात तिढा निर्माण झाला होता त्यानंतर युतीत बिनसल्याचे दिसत आहे. परंतू राष्ट्रवादीने देखील शिवसेनेसमोर एक अट ठेवल्याचे कळते आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेवरुन खलबतं सुरु जरी झाली असली तरी जरा धीरानं घेण्याचा निर्णय या पक्षांनी घेतला आहे. या पक्षांनी चर्चा करण्यासाठी थोडा वेळ घेण्याचे ठरले आहे. सत्तेतील पदांपासून राजकीय भूमिकेपर्यंत सर्वातच सुवर्णमध्य काढण्यात येईल असे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आता शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

जो फॉर्म्युला शिवसेनेने भाजपसमोर ठेवला होता तोच 50-50 चा फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेकडे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदांची मागणी केल्याची महिती आहे. त्यामुळे याला आता शिवसेना कसा प्रतिसाद देणार हे पाहणे औस्तुक्त्याचे ठरेल.

शिवसेनेपेक्षा आमचे फक्त दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीचा मुख्यमंत्रिपदाचा आमचा दावा चुकीचा नाही असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षासाठी शिवसेनेचा तर पुढील अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने तर हे स्पष्ट केले आहे की आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. परंतू युती तुटली का या प्रश्नाला कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बगल दिली. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार यावर देखील त्यांनी बोलणं टाळलं. तसेच भाजप सोबत जाणार का याचे उत्तर देखील त्यांनी दिले नाही. या सर्व पक्षांवर थोडं थांबा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रिट्रिट हॉटेलमध्ये आमदारांची बैठक घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

याआधी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीला फोन किंवा इतर प्रकारे संपर्क साधला नव्हता. त्यामुळे भाजपचा हा आरोप खोटा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जर युती तुटली असेल तरी ती भाजपने तोडली तसेच भाजप हा पर्याय संपला असेल तर तो भाजपने संपवला असे ही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. युतीत अडीच वर्ष मुख्यमंत्री हा महत्वाचा मुद्दा आहे, परंतू भाजप खोटं बोलली आणि मला खोटं ठरवलं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Visit : Policenama.com