काँग्रेसने सोडले ‘उपमुख्यमंत्री’ आणि विधानसभा ‘अध्यक्ष’ पद, ‘या’ नेत्यांना मिळू शकते मंत्रिपद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आघाडीमध्ये काँग्रेसला एकूण 13 मंत्री पद दिली जाणार आहेत. यामध्ये 9 कॅबिनेट मंत्री तर 4 राज्यमंत्री असतील. शिवसेनेकडे 11 कॅबिनेट मंत्री तर 4 राज्यमंत्री पद असणार आहेत. या व्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गृह आणि महसूल मंत्री पद वाटून दिले जाणार असल्याची देखील चर्चा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काय – काय मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिल्यानंतर राष्ट्रवादीला गृहमंत्री पद दिले जाऊ शकते. त्यातच काँग्रेसला महसूल खाते दिले जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद देखील दिले जाणार आहे. जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री केले जाणार असल्याचे समजते. मात्र काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पद नको असल्याचे सांगितले जात आहे.

या नेत्यांना मिळू शकते मंत्रीपद
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या 8 आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या 9-9 नेत्यांना मंत्री पद दिले जाऊ शकते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील या नेत्यांना मंत्री पद मिळू शकते. तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, केसी पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकुर, सतेज पाटील, सुनील केदार यांना मंत्री पद मिळू शकते. तर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटिल आणि राजेश टोपे यांची नावे मंत्रिपदाच्या यादीत आहेत.

विभागाच्या वाटणीबाबत 2 दिवसात निर्णय
बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुढील दोन दिवसांमध्ये विभागानुसार वाटणी देखील केली जाईल याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच कोणाला कोणती आणि किती मंत्री पदे मिळणार याबाबतचा निर्णय देखील येत्या दोन दिवसात घेतला जाईल असे देखील थोरात यावेळी म्हणाले.

आमदारांनी घेतली शपत
विधानसभा अद्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सकाळी निवडणूक आलेल्या आमदारांना शपत द्यायला सुरुवात केली. यावेळी सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी शपत घेतली. याचप्रमाणे इतर आमदारांचा देखील शपत विधी सोहळा पार पडला. उद्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहेत.

Visit : Policenama.com