ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांना ‘रुग्णवाहिके’चा दर्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र सरकारने आदेश दिला आहे की, वैद्यकीय उद्देशासाठी ऑक्सीजन घेऊन जाणार्‍या वाहनांना अ‍ॅम्ब्युलन्सचा दर्जा देण्यात येईल. या आदेशाची वैधता 1 वर्षासाठी केवळ ऑक्सीजन घेऊन जाण्यासाठी असेल. यादरम्यान अशा वाहनांना आपत्कालीन सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन ड्यूटीवर मानले जाईल.

तत्पूर्वी केंद्राने रविवारी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशला हे ठरवण्याची विनंती केली होती की, कोरोना व्हायरस महामारी दरम्यान सर्व आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सीजन योग्य प्रमाणात उपलब्ध ठेवावा तसेच दुसर्‍या राज्यांमध्ये ऑक्सीजन सिलेंडर्सची वाहतुक अबाध्य करावी. एका वक्तव्यात ही माहिती देण्यात आली होती.

यामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका डिजिटल बैठकीत ज्यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव, सचिव डीपीआयआयटी आणि सचिव, औषध हे सहभागी झाले होते. बैठकीत सात राज्यांचे आरोग्य सचिव आणि उद्योग सचिव सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी सर्व आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सीजन योग्य प्रमाणात उपलब्ध करणे तसेच सिलेंडर्सचा राज्यांतर्गत आणि दुसर्‍या राज्यातील पुरवठा अबाध्य करण्याबाबत चर्चा झाली.

केंद्रीय व्यापार, उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सुद्धा त्यांना संबोधित केले. आरोग्य मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, राज्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी आरोग्य केंद्रावरील ऑक्सीजनचे व्यवस्थापन करावे. स्टॉक कमी पडेल अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नये. वैद्यकीय ऑक्सीजनच्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये वाहतुकीवर कोणताही प्रतिबंध लावला जावू नये आणि शहरांमध्ये द्रव वैद्यकीय ऑक्सीजनच्या टँकर्ससाठी कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात यावी.