महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे तळाला गेलेली अर्थव्यवस्थेमुळे राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयानी महागणार आहे. 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च वाढला आहे. त्यामुळे पैशांच गणित कसं जुळवायचं याच विचारत सरकार होते. पेट्रोल-डिझेलवरील हा टॅक्स वाढल्यामुळे महागाई देखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पेट्रोलवर यापूर्वी 26 टक्के व्हॅट 10 Rs. cess आता 26 टक्के व्हॅट 12 Rs. cess
डिझलवर यापूर्वी 24 टक्के व्हॅट 1 Rs. cess आता 26 टक्के व्हॅट 3 Rs. cess

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. चारवेळा लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता पुन्हा पाचव्यांदा लॉकडाऊन वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे सगळे मोठे आणि लहान उद्योग बंद आहेत. आता सरकारने काही उद्योगांना परवानगी दिली आहे. मात्र अनेक उद्योगांना मजूरांचा प्रश्न भेडसावत आहे.