लज्जास्पद ! पूरग्रस्तांच्या मदतीतही भाजप आमदाराची ‘चमको’गिरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुरग्रस्तांना मदत करण्यासासाठी गेलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी काढलेल्या सेल्फीवरून त्यांच्यावर टीका होत असताना आणखी एक प्रकार समोर आला आहे. भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वत:चा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. अशा परिस्थितीमध्येही भाजपा आमदाराला चमकोगिरीचा मोह आवरताना न आल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरूपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री आणि भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांचे स्टीकर लावण्यात आले आहेत. तसेच प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचेही नाव टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

या जाहिरातबाजीचा नेटकऱ्यांनी फेसबूकवरून फोटो शेअर करून सरकारला गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याही कपाळावर महाराष्ट्र सरकार तर्फे असं का लिहित नाही ? असा संतप्त प्रश्न विचारला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच आयुष्य या पुरामळे उद्धवस्त झाले आहे. होत्याचे नव्हत एका रात्रीत झालेय. त्यामुळे सरकार आपल्याला मदत करेल, या अपेक्षेने पीडित नागरिक आस लावून बसले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –