ठाकरे सरकारचा आदेश ! आता सरकारी कार्यालयात आवश्यक असेल मराठी भाषेचा वापर, अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील स्थानिक भाषेला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता सर्व कर्मचार्‍यांना मराठी भाषा वापरावी लागेल. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना आदेश जारी केले आहेत, ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे की जर त्यांनी मराठी भाषा वापरली नाही तर कर्मचाऱ्यांची पगार वाढ थांबवली जाईल.

महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना यापूर्वीच मराठी विचारसरणीला चालना देण्याच्या बाजूने आहे. आता राज्यात सत्ता स्थापनेच्या काही दिवसानंतरच उद्धव ठाकरे सरकारने या दिशेने पाऊले उचलले आहे. सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालये, विभागीय कार्यालये आणि नागरी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा अधिकृत वापर करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. हे विभाग स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाताळत आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालये, विभागीय कार्यालये आणि संस्था कार्यालयात अधिकृत वापरासाठी केवळ मराठी भाषा वापरली पाहिजेत. असे न करणार्‍या कर्मचार्‍यांना ताकीद दिली जाईल किंवा गोपनीय अहवालात याची नोंद असेल किंवा त्यांचे इन्क्रिमेंट एक वर्षासाठी थांबवले जाईल.