Maharashtra Government | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे 4 निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Government । अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्याला फटका बसला आहे. बहुतांश फटका पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) जिल्ह्याला बसला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तर पूरस्थिती गंभीर स्वरूपाची निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या आयोजीत बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने (Cabinet) पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये इतक्या तरतुदीची मान्यता दिली आहे. यामध्ये मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वाचे हे निर्णय घेण्यात आले आहेत.

1. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयाची मान्यता.

2. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास आज राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या 4 ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे आहे. या भागातील रुग्णांना उपचारांकरिता पुणे, नागपूर येथे जावे लागते. यामुळे रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका, औषधे, उपकरणे व मनुष्यबळ यासाठी 104 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

3. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालये यांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

4. जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) मान्यता दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता. शिरोळ) नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्यात येणार आहे.

Web Title :- maharashtra government | maharashtra cabinet meeting these four major decisions taken by the state government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांची तहान भागणार, मुळशीतून 5 TMC पाणी घेणार

Aadhaar चा अड्रेस अपडेट करणे झालं एकदम सोपे, अवलंबा ‘ही’ ऑनलाइन पद्धत; जाणून घ्या 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी