काँग्रेस, राष्ट्रवादीची उद्या दिल्लीत ‘फायनल’ बैठक ? सत्तास्थानेचा तिढा सुटणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यासंबंधित दिल्लीत वेगाने हालचाली सुरु झाली आहेत. सोमवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक पार पडली मात्र या बैठकीत सत्तास्थापनेवरुन चर्चा झाली नसल्याचे पवारांनी सांगितले. परंतू आता उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

दोन्ही पक्षांच्या या बैठकीला सोनिया गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे प्रमुख नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह काही महत्वाचे नेते उपस्थित असतील तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित असतील. यावेळी जर शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली तर आगामी येणाऱ्या निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवायच्या, तसेच या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत देखील चर्चा होऊ शकते.

सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी 6 महिन्याचा कालावधी दिला आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहेत. तसेच शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा कुठून आला हे मला ठाऊक नाही, हे शिवसेनेच्या नेत्यांनाच विचारा.

राज्यातील शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस यांच्यात समन्वय समितीची बैठक झाली, या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली असेही सांगण्यात आले परंतू पवारांनी सांगितले की यावर अजूनही काहीही ठरलेले नाही, तर कॉमन मिनिमम प्रोग्रॉम कशासाठी करु, राज्यातील स्थितीबाबात चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल की महाशिवआघाडीचे सरकार राज्यात स्थापनेला किती दिवस लागतील.

Visit : Policenama.com