मुख्यमंत्र्यांच्या ‘एन्ट्री’वर विरोधकांची घोषणाबाजी, ‘आले रे आले…चोरटे आले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाले आहेत. या अधिवेशनासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडला होता. तेथे शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी..,अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची एन्ट्री झाल्यानंतर विरोधकांनी वेगळ्याच घोषणांना सुरुवात केली. त्यात आले रे आले… चोरटे आले, अशाही घोषणा विरोधकांनी दिल्या.

सरकार नेहमी अधिवेशन गुंडाळण्यात पटाईत, पण यंदा आम्ही सरकारला उत्तर मागू. सत्तेसाठी पक्ष बदलणारे विखे आहेत, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. गृहनिर्माण विभागावर टीका करणारे आता काय करतात बघू, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

हे पावसाळी अधिवेशन विधानसभा निवडणुकांपूर्वीचे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी हे अधिवेशन टर्नींग पाँईट असणार आहे. तसंच मागील पाच वर्षातील अधिवेशनाचे चित्र या अधिवेशनात दिसणार नाहीये. नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विरोधकांच्या पंगतीत बसणारे आता सत्ताधाऱ्यांच्या पंगतीत बसणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाची रंगत वाढणार आहे.

दरम्यान, हे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे. यात निवडणूक आधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. तर महत्त्वाचे विधेयक ही मंजूर केले जातील.

You might also like