‘महाशिवआघाडी’वर खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात चर्चा सुरु आहे ती महाशिवआघाडीची. कारण सर्वांना आस लागली आहे ती सरकार स्थापनेची. या तिन्ही पक्षात आता किमान समान कार्यक्रमावर एकमत होताना दिसत आहे. आता अगदी काही दिवसात स्पष्ट होईल की महाशिवआघाडी सत्तास्थापन करु शकेल की नाही. परंतू शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना महाशिआघाडीबद्दल विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की महाशिवआघाडीची अधिकृत घोषणा झाल्यावर यावर चर्चा करु.

अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी ही माझी इच्छा आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार येणार की दुसरे कोणते सरकार येणार यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच सांगू शकतील.

राज्यात सत्तास्थापनेवरुन महाशिवआघाडीची चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत होताना दिसले. यातील करारानुसार राज्यात पूर्ण 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह एकूण 14 मंत्रिपदे मिळतील तर काँग्रेसला 12 आणि राष्ट्रवादीला 14 मंत्रिपदे देण्यात येतील. आता महाशिवआघाडी सत्ता स्थापन करते की आम्हीच सरकार स्थापन करु म्हणणारे भाजप सरकार सत्ता स्थापन करेल हे लवकरच कळेल.

Visit : Policenama.com