राज्यात 5 टप्प्यात Unlock ! नियमावली जाहीर, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या सोमावरपासून म्हणजे 7 जूनपासून राज्यात पाच स्तरांमध्ये अनलॉक (Unlock. ) होणार आहे. राज्यातील (Maharashtra Unlock. ) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असे आदेशात नमूद केले आहेत.

कोरोना पॉझिटिव्हिटी (Positivity) दर आणि ऑक्सिजन बेड्सची (Oxygen beds) उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील केले जाणार आहेत.
त्यासाठी एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल

अनलॉकच्या 5 स्तरातील जिल्हे

पहिला स्तर – लातूर, नागपूर, नांदेड, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, वर्धा, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, जालना, जळगाव, ठाणे

दुसरा स्तर – नाशिक नंदूरबार, पालघर, उस्मानाबाद, परभणी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, औंरंगाबाद, हिंगोली, गडचिरोली

तिसरा स्तर – पुणे, बीड, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती

चौथा स्तर – रायगगड, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी

पाचवा स्तर – कोल्हापूर

या प्रमाणे त्या त्या स्तरावर जिल्हे अनलॉक केले जाणार आहेत. या आदेशानुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

हे ही वाचा

Maharashtra Unlock News : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’, नियमावली जाहीर; 5 टप्प्यात होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

मुंबई : राज्यात अनलॉक संदर्भात सुरू असलेला संभ्रम राज्य सरकारने आता दूर केला आहे. राज्यात कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत लागू असलेले निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही नियमावली सोमवार, 7 जूनपासून लागू होईल. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला.

दोन निकषांवर आहे नियमावली
3 जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील. या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल किंवा कडक केले जाणार आहेत. अनलॉकचे एकूण पाच स्तर ठरवण्यात आले आहेत