कंगनाच्या अडचणीत वाढ होणार, ‘ड्रग्स’ प्रकरणाची चौकशी करणार मुंबई पोलीस

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कंगना रणौतच्या कार्यालयाला सील केल्यानंतर आता कंगनाविरुद्ध ड्रग्स प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांकडे हा तपास सोपविला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रणौत ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. कंगनाच्या एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे त्यांनी हे प्रकरण उचलले आहे. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने या मुलाखतीत कंगनाने ड्रग्स घेतल्याचा दावा केला होता.