गणेशोत्सव 2020 : घरगुती गणेश मुर्तींवर 2 फुटांचं बंधन ! जाणून घ्या राज्य सरकारच्या महत्त्वाच्या ‘या’ 12 मार्गदर्शक सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संकटाचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेतल्या आहेत. यंदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. गणेशोत्सव मंडळांच्या मुर्तींच्या उंचीवर 4 फुटांचं तर, घरगुती गणेश मुर्तींवर 2 फुटांचं बंधन असणार आहे.

राज्य सरकारनं गणेशोत्सवासाठी काही मर्गदर्शक सूचना केल्या आहेत. गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरतीही घरीच करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी सरकारनं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे –

– सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या लागतील.

-उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणांसोबत सुसंगत असावेत. सजवाट करताना कोणतीही कोणतीही भपकेबाजी नसायला हवी.

– शक्यतो घरातील धातू किंवा संगमरवर आदी मुर्तींचं पूजन करावं. मुर्ती पर्यावरण पूरक असल्यानं शक्यतो त्याचं विसर्जन घरीच करावं. जर हे शक्य नसेल तर मुर्तीचं विसर्जन हो कृत्रिम तलावात करावं.

– गणेश मुर्तींचं विसर्जन पुढं ढकलणं जर शक्य असेल तर माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणं शक्य आहे. यामुळं विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यास मदत होईल आणि सर्वांनाच सुरक्षितही राहता येईल.

– सार्वजनिक उत्सवासाठी देणगी किंवा वर्गणी स्वेच्छेनं मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळं गर्जी आकर्षित होणार नाही हे पहावं. जाहिराती या आरोयग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या असाव्यात याकडेही लक्ष द्यावं.

– सांस्कृतिक कार्यक्रमांऐवीज आरोग्य किवा सामाजिक उपक्रम घ्यावेत. रक्तदान शिबीरास प्राधान्य द्यावं.

ganesh 2020

ganesh usav 2020