‘या’ कारणामुळं शिवसेनेबाबत सोनिया गांधी ‘नरमल्या’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने जोरदार हालचाली करूनही सत्ता स्थापन करण्यात शिवसेनेला यश आले नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह अनेक नेते सहमत नव्हते मग त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधींना इशारा दिल्यानंतर सोनिया गांधींनी मवाळ भूमिका घेतल्याचे समजते.

शिवसेनेने भाजप आपल्याशी खोटं बोलत असल्याचे सांगत युतीमधून काडीमोड घेतला आणि राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्तेबाबतची बोलणी सुरु केली. त्यानंतर अनेक हालचाली झाल्या मात्र काँग्रेसचे समर्थनाचे पत्र मिळाले नाही म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही.

राज्यातील अनेक नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला की, जर आता योग्य निर्णय घेऊन आपण शिवआघाडी केली नाही तर राज्यातील काँग्रेस पूर्णपणे संपेल. यावेळी पृथ्वीराज चौहान, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील अशा अनेकांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा देखील केली. काँग्रेस आमदार देखील सत्तेत सामील होण्यासाठी इच्छुक असल्याचे समजताच सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी फोनवरून चर्चा केली.

पवार आणि सोनिया गांधी यांच्या चर्चे नंतर सोनिया गांधी यांनी मवाळ भूमिका घेतली आणि शिवआघाडीत जाण्याचे जवळजवळ निश्चित केले. त्यानंतर याबाबत दिल्लीतून घोषणा होणार असल्याचे देखील समजते.

Visit : Policenama.com