Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | शिंदे- फडणवीस सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार आजच होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ३०० कोटी रूपये त्वरीत वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे आता एसटीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार आजच होणार असून ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (Maharashtra Government) ऐन मकरसंक्रातीच्या तोंडावर एसटीचे कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत होते. त्यातच आता राज्य सरकारकडून आजच पगार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी सुखावले.

एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या ७ तारखेला होत असते. पण गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. (Maharashtra Government)त्यात कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या यामुळे एसटी महामंडळाला प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आल्यामुळे एसटीचा खूप तोटा झाला होता. त्यामुळे वेतन होण्याच्या तारखेत अनियमितता होती. त्याविरोधात न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणात राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचा पगार ७ ते १० तारखे दरम्यान देणार असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. तरीही पगाराच्या तारखेत अनियमीतता होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

एसटी कामगारांच्या वेतनाला दर महिन्याला ३६० कोटी रूपये लागतात.
पण विद्यमान सरकार फक्त १०० कोटी दर महिन्याला देते.
त्यामुळे कोर्टात कबुली दिल्याप्रमाणे राज्य शासन वागत नाही.
त्यामुळे यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांनी दिला होता. (Maharashtra Government)

कर्मचाऱ्यांकडून नोव्हेंबर महिन्यातला थकीत वेतन देण्यात यावा अशी मागणी केली जात होती.
त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली आणि ३०० कोटींचा निधी
रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे. (Maharashtra Government)

Web Title :-Maharashtra Government | st employees will get their salary today the state government has deposited 300 crores

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

Nashik Graduates Constituency Election | सुधीर तांबेनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका