ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ अटींवर हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस 8 जुलैपासून सुरू करण्यास परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन वगळता हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुले होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्य सचिव यांनी आदेश जारी केले आहेत.

राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्स उघडण्यास परवानगी दिली आहे. मागील 100 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असलेले हॉटेल्स 8 जुलैपासून उघडली जाणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये 33 टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे.

हे आहेत नियम
1. हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या 33 टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.
2. रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे.
3. ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पहाणं गरजेचं आहे.
4. रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे.
5. सॅनिटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे.
6. हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेली गोमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत.
7. जे ग्राहक हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.