‘या’ कारणामुळं उध्दव ठाकरेंनी भाजपाला सोडलं, केंद्रीय मंत्र्याची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येमधील राममंदिराचा प्रश्न सुटला हा नक्कीच आनंदाचा विषय असून आता केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणसंबंधी कायदा बनविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांनी व्यक्त केले आहे. एल शाळेतील कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटीच भाजपची साथ सोडली असल्याचे म्हटले आहे. भाजपकडे आणि शिवसेनेकडे बहुमताचा आकडा होता, मात्र शिवसेनेचा आदर न केल्याने आता किती दिवस ते दुसऱ्या पक्षाबरोबर राहतात हेच पाहायचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच उत्तरप्रदेशमधील वाढत्या लोकसंख्येवर देखील त्यांनी चिंता व्यक्त करत यावर निर्णय घेणे देखील गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकीसाठी शिवसेनेला आमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com