विधानसभा निकालानंतर ‘गायब’ होण्याबाबत स्वतः खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवस्वराज्य यात्रेमार्फत राष्ट्रवादीचा झंझावाती प्रचार करणारे अमोल कोल्हे यांनी शिरूरमध्ये आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित होते. मात्र झंझावाती प्रचारानंतर अमोल कोल्हे हे निकालावेळी कोठेच दिसले नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना अमोल कोल्हे कोठे गेले असा प्रश्न पडला होता.

कार्यकर्त्यांसोबत पत्रकारांना देखील प्रश्न पडला होता की, कोल्हे नेमके कोठे गायब झाले. मात्र कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी स्वतः अमोल कोल्हे यांनी याबाबत खुलासा केला केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याला एक कळतं, आपला रोल संपला की आपण व्यासपीठ सोडायचं. स्टेजवर कधी थांबायचं आणि विंगेत कधी जायचं हे ज्याला कळतं त्यालाच रोल निभावता येतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे’, असे म्हणत अमोल कोल्हेंनी पक्षाने दिलेली जबाबदार आपण पार पाडली, त्यानंतर आपलं काम संपलं, असं सांगितलं.

Maharashtra Government: Where did Amol Kolhe disappear after the election result? MPs say 'reason | Maharashtra Government: निकालानंतर अमोल कोल्हे कुठं गायब? खासदार महोदयांनीच सांगितलं राज'कारण'

अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यामुळे महाशिवआघाडी बद्दल विचारले असता कोल्हे म्हणतात, याची अधिकृतपणे घोषणा झाली की बोलू. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोल्हे म्हणाले, राज्यात सरकार स्थापित होणं महत्वाचं आहे आणि महाशिवआघाडी बाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेतील.

माझं जनसंपर्क कार्यालय तुमचंच आहे असं कोल्हे कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले. तसेच शरद पवार जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल असा विश्वास देखील अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केला.

Visit : Policenama.com