PM मोदींच्या भेटीनंतर BJP – NCP एकत्र येणार ? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात सत्तास्थापनेवरुन तिढा सुटला नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. परंतू या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. त्यापार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार का असे संजय राऊत यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिले की हे भाजपला विचारा.

संजय राऊत म्हणाले की पुढील आठवड्यात राज्यात मजबूत सरकार स्थापन होईल. राज्यात अस्थिरता आहेत. पंतप्रधानांना चिंता असेल त्यावर कदाचित हे नेते बोलले असतील. केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या पाठिशी उभे राहिले. पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही, तर देशाचे आहेत. हे राज्य निर्माण होईल तेव्हा त्यांना दिल्लीचा आशीर्वाद असेल असे सांगत अमित शहांनी वारंवार मोदींची भेट घ्यावी.

संजय राऊतांनी रेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीवर देखील भाष्य केले. शहा- मोदी यांची वारंवार भेट व्हावी. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाली त्यात नवल नाही. अनेक गृहखात्याशी बिलं असतील तर भेटले असतील. संसदेचं अधिवेशन सुरु असलेल्यांनी ते भेटले असतील.

संजय राऊत पुढे म्हणाले की महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली 100 टक्के मजबूत सरकार येईल. महत्वाच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. निर्णय घेतले जात आहे. निश्चितच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनेल. काँग्रेस-राष्ट्रवादीशी व्यवस्थित संवाद झालेला आहे. संध्याकाळी शरद पवारांची छोटी बैठक होऊ शकते असा दावा संजय राऊत यांनी केला.

राज्यसभेत बदललेल्या जागावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. आम्ही कोणत्याही बाकावर असलो तरी आमचा आवाज सभापतींपर्यंत आणि देशांपर्यंत पोहचतो. नियमांचे उल्लंघन झालंय का असा प्रश्न उपस्थित केला आहे. राऊतांना राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट झाल्यानंतर सांगितले होते की कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधान मोदींसमोर अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे प्रश्न मांडले. या नुकसानाकडे लक्ष वेधल्याचे ट्विट शरद पवारांनी केले.

Visit :  Policenama.com