काय सांगता ! होय, लंडनसारखं मुंबई Eye, 800 फुटांवरून पाहा ‘नजारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लंडनमधील ‘लंडन आय ‘ म्हणजेच मोठ्या आकाराचा आकाश पाळणा जगप्रसिद्ध आहे. लंडनमधील हा पाळणा १३५ मीटर उंच आहे. आता लंडन आय प्रमाणे मुंबईत देखील ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता लंडन आय प्रमाणे मुंबईतील ‘मुंबई आय’ द्वारे संपूर्ण शहराचे विहिंगम दृश्य पाहायला मिळणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

‘मुंबई आय’ द्वारे मिळणार पर्यटनाला वाव
लंडनमधील ‘लंडन आय’ ला भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी ३५ लाखांपर्यंत असते. मुंबई आय साकार झाल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या ‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.’मुंबई आय’ मुंबईतील वांद्रे – वरळी सी लिंकजवळ साकारण्यात येणार आहे. वांद्रे येथे सी लिंक सुरू होताना टोल नाक्याजवळ असलेल्या जागेवर ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. सीआरझेड व इतर परवानग्यांबाबत अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

यामुळे कोलमडला आधीचा प्रस्ताव
याआधीदेखील चार वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचा वांद्रे बॅण्ड स्टॅण्डजवळील १४ हजार स्केअर मीटर जागेवर ‘मुंबई आय’ उभारण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेच्या प्रस्तावानुसार या मुंबई आयची उंची ६३० मीटर इतकी असणार होती. हा जगभरातील सर्वात उंच पाळणा ठरला असता. मात्र, पुरेशा निधीअभावी हा प्रस्ताव बास्तनात गुंडाळला गेला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/