‘आता हॉटलेचं बिल बहुतेक शेतकरी भरतील’ ? ‘या’ अभिनेत्याची ‘महाविकास’आघाडीवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकासआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र करून विविध हॉटेल्समध्ये ठेवलं होतं. गेल्या महिन्याभरापासून हे आमदार पंचतारांकित हॉटेलात राहत होते. यावरून अभिनेता सुमित राघवननं तिन्ही पक्षांवर टीका केली आहे. आता हॉटेलची बिलं कोण भरणार ? कदाचित शेतकरी असं त्यानं म्हटलं आहे. सुमितनं याबाबत ट्विट केलं आहे.

शिवसेनेनं आपल्या 56 आमदारांना आधी रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवलं. भाजपकडून आमदारांना आमिष दाखवलं जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. ही सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवलं होतं. काँग्रेसनंही आपले सर्व आमदार आधी जयपूरला हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर मुंबईतील जुहूच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या बंडानंतर 5 ते 6 आमदार बेपत्ता झाले होते. यानंतर राष्ट्रवादीनंही आपल्या आमदारांना पवईतील रेनिसन्स हॉटेलात ठेवलं होतं.

यानंतर महाविकासआघाडीचा बहुमताचा आकडा दाखवण्यासाठी तिन्ही पक्षांच्या आमदारांना ग्रँड हयात हॉटेलात एकत्र आणलं होतं. गेल्या महिन्याभरापासून आमदार ग्रँड हयात, जे डब्ल्यू मॅरियट, रेनिनसन्स अशा पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करत आहेत. यानंतर सुमित राघवननं हॉटेलच्या या खर्चावरून महाविकासआघाडीवर टीका केली आहे. यापूर्वीही सुमितंन आरेतील झाडे तोडून मेट्रो कारशेड बनवण्याला समर्थन दिलं होतं. त्यावेळी सुमितवर टीका झाली होती.

Visit : Policenama.com