मुस्लिमांना शिक्षणात 5 % आरक्षण देणार ठाकरे सरकार, विधान परिषदेत नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लीमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहे. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली.

नवाब मलिक म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. त्या दृष्टीने मुस्लीम आरक्षणाचा कायदा करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. शैक्षणिक प्रवेश सुरु होण्यापूर्वी हा कायदा करून असे आश्वासन मलिक यांनी दिले आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजाला शैक्षणिक संस्थामधल्या प्रवेशासाठी दिलेलं 5 टक्के आरक्षण अबाधित ठेवलं आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर घटनेला धरुनच निर्णय घेण्यात येणार आहे. मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

मुस्लीम आरक्षणाबाबात 2014 प्रमाणे आदेश काढून त्याचे कायद्यात रुपांतर करु, असे आश्वासन मलिक यांनी विधानपरिषदेत दिले आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाबाबत जे मान्य केलं आहे त्यादृष्टीने राज्यात तातडीने मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मुस्लीम आरक्षणाबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like