Coronavirus : राज्यात रेमडेसिविरची प्रचंड मागणी, ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य सरकार लवकरच रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिज्यूमैब या अँटी-व्हायरल औषधांना विकत घेऊन गरजूंना उपलब्ध करुन देणार आहे. यासह कोविड -19 रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

देशमुख यांनी बैठकीनंतर सांगितले की, महाराष्ट्रात व बाहेरही या औषधांची मोठी मागणी आहे. ज्यामुळे राज्य सरकार रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिज्यूमैब मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे. माहिती देताना ते म्हणाले की, ही औषधे राज्यभर गरजू लोकांना उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने त्यांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू केली आहे. याशिवाय औषधांचा काळाबाजार होण्याच्या घटनांवर पोलिस विभाग आणि अन्न व औषध प्रशासन संयुक्तपणे कडक कारवाई करेल.

मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,354 नवीन घटनांमध्ये समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या 90 हजार ओलांडली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आता शहरात कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण 90,149 वर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त आणखी 73 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 5,202 वर पोहोचली आहे. बीएमसीने शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मृत्यूच्या 73 घटनांपैकी 54 रुग्णांना गंभीर आजार आहेत.

तथापि, दिलासा मिळाल्याची बातमी अशी की, शुक्रवारी 2,183 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 61,934 झाली आहे. शहरातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण 68 टक्के आहे. मुंबईत अजूनही 22,738 लोक कोविड -19 ने त्रस्त आहेत. या व्यतिरिक्त शहरातील 905 नवीन संशयित रुग्णांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.