सर्वात मोठी बातमी ! राज्यपालांकडून देवेंद्र फडणवीसांना सत्तास्थापनेचं ‘आमंत्रण’ मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे मात्र भाजपा आणि शिवसेनेमध्ये तेढ निर्माण झाल्यानं राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.


11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून भाजपाला निमंत्रण येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय स्तरावरून भाजप आणि शिवसेनेत दिलजमाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळाल्यानंतर भाजपाकडून कोणते पाउल उचललं जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगामी मुख्यमंत्री कोण याबाबतच उत्तर लवकरच मिळणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येवुन सत्ता स्थापन करणार काय अशी देखील चर्चा चालु असतानाच राज्यपाल 11 नोव्हेंबरला भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Visit : Policenama.com