प्रवेशादरम्यान ‘SEBC’च्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी ‘सर्टिफिकेट’ सादर करण्यासाठी वाढीव मुदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसईबीसी प्रवर्गातील विध्यार्थ्यांना राज्य सरकाने मोठा दिला दिला आहे. या प्रवर्गातील ज्या विध्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्या विध्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. त्याचप्रमाणे ज्या विध्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणीसाठी अर्ज केले नाहीत. त्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली जाणार असल्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत मराठा समाजातील विध्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाला विलंब होत असल्याचा औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे विध्यार्थ्यांना मराठा आरक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. ज्या विध्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला आहे त्या विध्य़ार्थ्यांना व्हेरिफिकेशन होईपर्यंत टोकन क्रमांक ग्राह्य धरण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली होती. यावर उत्तर देताना विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

विध्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्याक्षांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकिमध्ये एसईबीसीच्या विध्यार्थ्यांसाठी जात पडताळणीसाठी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र सादर केले जाणार नसल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या

तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’

नेहमीच जेवणावर ताव मारत असाल तर होऊ शकतो ‘हा’ त्रास