राज्यातील ‘सत्ता’कारणात ‘घोडे’बाजार ‘तेजीत’ ! काही लोकांची पैशांची भाषा, शिवसेनेनं सांगितलं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेला काही तास शिल्लक असले तरीही शिवसेना आणि भाजपमधील सत्तेची आणि चर्चेची कोंडी काही सुटताना दिसून येत नसून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.त्यामुळे आता आपले आमदार फुटण्याच्या चिंतेने त्रस्त असलेल्या शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. काही लोकं आमच्या आमदारांना पैश्याचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यपालांना भेटणार भाजप नेते
मुंबईत आजचा दिवस अनेक राजकीय घटनांसाठी महत्वाचा असणार आहे. भाजप नेते आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असून सत्तास्थापनेचा दावा देखील करणार आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच आनंदाची बातमी मिळेल असे काल म्हटले होते, मात्र त्यांनी किती आमदार त्यांच्याकडे आहेत याची नेमकी आकडेवारी दिलेली नाही.

12 वाजता शिवसेना आमदारांची बैठक
उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता शिवसेना भवनात हि बैठक होणार आहे. या बैठकीत ते आमदारांशी चर्चा करणार असून त्यांचे मतदेखील जाणून घेणार आहे. त्यामुळे शिवसेना दबाव वाढवून सत्तेतला वाटा वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत जावे कि नाही याविषयी आमदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच या बैठकीनंतर ते अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

थैलीची भाषा करत आहेत काही लोकं
आमदार फुटण्याची चिंता असलेल्या शिवसेनेने आता भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर टीकेचे बाण सोडताना लिहिले आहे कि, काही लोकं आमदारांना पैश्याचे आमिष दाखवत असून थैलीची भाषा करत आहेत. मागील सत्तेचा वापर हा यावेळी सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. आमदार फोडण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार हवे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके