कुठल्याही परिस्थितीत 25 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन होणार, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. येत्या 25 तारखेला राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल असे सूचक विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्तार बोलत होते. त्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले आहे. यावेळी आमदारानं पॅन कार्ड, आधार कार्ड असे ओळखपत्र आण्यास देखील सांगितले असून चार पाच दिवसांच्या राहण्याच्या तयारीने या असे आदेश आमदारांना देण्यात आले आहेत.

पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल
अब्दुल सत्तार यांनी सांगितले की या आधी देखील अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने भाजपकडे केली होती. मात्र आता पाच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे. त्याचबरोबर सोबत असलेले सर्व पक्ष मिळून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे मत सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

पॅनकार्ड, आधारकार्ड आणण्याचे आदेश
सर्व आमदारांना शुक्रवारी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. येताना तयारीनिशी येण्यास सांगितलं आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्ड आणण्याचे आदेश दिले आहेत. सही तसंच फोटो आमदारांचाच आहे याची माहिती राज्यपालांना लागेल, त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात असल्याचं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

महाशिवआघाडीच सरकार येणार यात शंका नाही
महाशिवआघाडीच सरकार आता स्थापन होईल यात कोणतीही शंका नसल्याचे सत्तार यांनी सांगितले. तसेच येत्या आठवड्याभरात हे सरकार सत्तेवर येईल एक दोन दिवस पुढे माघे होतील असेही सत्तार यावेळी म्हणाले.

Visit :  Policenama.com