राज्य सरकारचा 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा विचार, शिफ्टमध्ये होऊ शकतात क्लासेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणादरम्यान, महाराष्ट्र सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सरु होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरु केल्या जातील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील 15 शहरे आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिफ्टमध्ये वर्ग चालवणं, शाळेचे तास कमी करणं, सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं आणि क्रीडा उपक्रम राबवण्याच्या योजनांची माहिती दिली आहे.
शिक्षणमंत्री म्हणाल्या की, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून त्यांना सांगायचे की, कोणत्या परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवणं. एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असेल अशा सूचना देणं.

दरम्यान, शाळा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर हानिकारक परिणाम होईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवा़ड यांनी सांगितलं. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे. परंतु मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमध्ये याचा विचार होऊ शकत नाही. शिक्षणमंत्र्यांनी असे संकेत दिले आहेत की, शाळा पुन्हा सुरु करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. या संसर्गामुळे संपूर्ण देशात 3 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1.32 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. यावेळी सर्व लोकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी जोर देण्यात येत आहे. सध्या सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा शिथिल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like