Maharashtra Govt Will Issue Special Postage Stamp | शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : Maharashtra Govt Will Issue Special Postage Stamp | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त (Shiv Rajyabhishek Sohla – Utsav) सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे. (Maharashtra Govt Will Issue Special Postage Stamp)

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे (Post Master General Swati Pandey), सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे (Vikas Kharage), राज्यपालांचे सचिव संतोषकुमार (Santosh Kumar, Secretary to the Governor) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Govt Will Issue Special Postage Stamp)

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची
आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार
जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे.
याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून
राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे.
महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी
सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

Advt.

टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title :   Maharashtra Govt Will Issue Special Postage Stamp | On the occasion of the 350th anniversary of Shiv Rajya Abhishek Day, the Government of Maharashtra will issue a special postage stamp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख