Maharashtra Gram Panchayat By Election | ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ! पुणे जिल्हयातील 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Gram Panchayat By Election | राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे (Pune Gram Panchayat By Election). 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Gram Panchayat By Election)

तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस 5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 मे या कालावधीत 14 मे, 15 मे तसेच 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येणार आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. (Maharashtra Gram Panchayat By Election)

मतदान 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत (Pune Collector Office) 9 जून 2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्हयात 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे (Resident Deputy Collector Himmat Kharade) यांनी दिली आहे.

Web Title :-  Maharashtra Gram Panchayat By Election | Gram Panchayat by election program announced! By election will be held for 243 vacancies in Pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

Shivsena MP Sanjay Raut | महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव ?; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Supriya Sule On PM Modi | सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाल्या – ’56 इंच छाती फक्त भाषणापुरतं मर्यादित, पण वास्तवापासून दूर’

Pune News | माईचं स्वप्न पुर्ण होणार ! ममता बाल सदनमध्ये पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या 9 लेकींचा थाटात साखरपुडा

Rajmudra On MNS Flag | ‘मनसे’च्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही; पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध वकिलाने दिला दाखला

Dilip Walse Patil | … तर कठोर पावले उचला; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पोलिसांना आदेश