Sangli News : क्रिकेटच्या मैदानात जीव गमावलेल्या ढवळीच्या अतुल पाटलांचा 57 मतांनी विजय

सागंली : पोलीसनामा ऑनलाइन – एकंदरीत राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सागंली जिल्ह्यातील ढवळी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार अतुल पाटील यांचं रविवारी क्रिकेट खेळता ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल पाटील यांचा विजय झाला आहे. ग्रामस्थांनी अतुल पाटील यांच्या विजयानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी भावना व्यक्त केली.(Maharashtra gram panchayat election results 2021Sangli Atul Patil won election after death)

दरम्यान, अतुल पाटील हे ढवळी गावचे उपसरंपचपदावर कार्यरत होते. तासगाव व ढवळी येथील केमिस्ट, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे विद्यमान संचालक, अतुल पाटील यांचा क्रिकेट खेळत असताना शनिवारी मृत्यू झाला होता. आटपाडी येथे संघटनेच्या क्रिकेट मॅचेस सुरू असताना ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने अतुल पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

अतुल पाटील यांच्या निधनानं ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतुल पाटील यांना क्रिकेट खेळताना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचं शनिवारी निधन झालं होते. अतुल पाटील यांनी ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत ५७ मतांनी विजय मिळवला आहे. ढवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतुल पाटील हे सदस्यपदी विजयी झाले. मात्र, विजय जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं, त्यामुळे ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी भावना ग्रामस्थांची आहे.

सांगलीत काँग्रेस आघाडीवर
सांगली जिल्ह्यात एकूण १५२ ग्रामपंचायतची निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात आजचे निकाल आणि अगोदर बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत अशा एकूण निकाल जाहीर करण्यात आले. यात काँग्रेसच्या पॅनलने सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. यात काँग्रेस – ४९, राष्ट्रवादी ३४, स्थानिक आघाडी ३४, भाजपा २०, शिवसेनेनं १५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

सांगली ग्रामपंचायत निकाल
काँग्रेस पॅनल – ४९
राष्ट्रवादी पॅनल – ३४
स्थानिक आघाडी – ३४
भाजपा पॅनल – २०
शिवसेना पॅनल – १५