Satara News : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावातच दारूण पराभव

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. या गावातच उदयनराजे गटाने जोरदार प्रचार देखील केला होता.

तरीही त्यांना यश प्राप्त करता येऊ शकलेलं नाही. कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ जागांपैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने १० जागांवर मुसंडी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उदयनराजे त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच त्यांचा मोठा पराभव झाला आहे.