पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा दणदणीत विजय

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामपंचायत निवडणुक निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ग्रामपंचायत निवडणुक निकालाकडे नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील विविध भागातील ग्राम पंचायतींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असता. पहिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे. दरम्यान कराडमधून एक निकालाची मोठी बातमी समोर येते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील कोळकी गावचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोळकीच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी पॅनल उभे केले होते मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. या ठिकाणी भाजपची सपशेल हार झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.

बिनविरोधमध्ये सरशी कोणाची याकडे लक्ष लागून आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागत असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीची आकडेवारीही लक्षनिय आहे. बिनविरोधच्या आकडेवारीत शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. यामुळे आजचे सर्व ग्राम पंचायतींचे निकाल सारे चित्र स्पष्ट करणार आहेत.