‘आता ‘तो’ विषय पुरे झाला, महाराष्ट्रासमोर त्यापेक्षाही महत्वाचे प्रश्न आहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी कोल्हापुरात वार्ताहरांना बोलत होत्या.

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कराची तक्रार मागे घेतली त्याअनुषंगाने वार्ताहरांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला. राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून, सर्वानी त्यावर लक्ष द्यावे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर अजित पवार यांनाही त्यात गैर काय असे म्हटले आहे, याची आठवण सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन दिली.

तक्रार मागे

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. कौंटुबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी सांगितले. तसेच पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिले आहे. त्याचसोबत रेणू शर्माच्या वकिलांनी सुद्धा केस सोडल्याची माहिती मिळत आहे.