Maharashtra Health Department | कोरोना काळातील कंत्राटी 597 परिचारिकांसाठी खूश खबर; महाराष्ट्र सरकार करणार कायमस्वरूपी सेवेत रुजू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Health Department | कोरोना महामारीमुळे फक्त राज्याची किंवा देशाची नव्हे तर संपूर्ण जगाची आरोग्य व्यवस्था ढासळली होती. या महामारीच्या काळात अनेक डॉक्टर आणि परिचारिका यांनी जिवाची बाजी लाऊन काम करत कर्तव्य पार पाडले. आपल्या संपूर्ण राज्याने कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या पाहिली नव्हती. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करताना अनेक डॉक्टर आणि परिचारिकांना जीव गमवावा लागला. या सर्व रुग्णांना सेवा देता यावी यासाठी अनेक परिचारिकांना कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. पण कोरोना महामारी गेल्यानंतर त्यांचे भविष्य काय हा प्रश्न या परिचारिकांसमोर पडला होता. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Health Department) आता या परिचारिकांना मोठा दिलासा दिला आहे.

 

कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर कामावर लागलेल्या 597 परिचारिकांना आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) मोठा दिलासा दिला आहे. या सर्व परिचारिकांना कायमस्वरूपी कामावर ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात या परिचारिकांसोबत 11 महिन्यांचा करार केला होता. मात्र, तो संपुष्टात आल्याने या सर्व परिचारिकांना घरचा रस्ता धरावा लागणार होता. पण राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून या सर्व परिचारिकांना कायमस्वरूपी कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य सेवा व संचालक आयुक्त पदावरून बदली होण्यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी 597 कंत्राटी परिचारिकांना शासनात कायमस्वरूपी करण्याचा निर्णय जारी केला आहे.
त्यांच्या आदेशानुसार, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळे यांनी त्यांच्या मंडळातील एनयूएचएम, आरबीएसके,
आदिवासी, बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच कार्यक्रमांतर्गत रिक्त असलेल्या पदांवर या परिचारिकांना नेमणुका द्याव्यात.
उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ स्तरावर नेमणुका देत असताना सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी आणि त्यानुसार समुपदेशाने रिक्त पदावर निवड करावी.
जर आरोग्य सेविका एकाच दिवशी सेवेत रुजू झाल्या असतील, तर त्यांची सेवा ज्येष्ठता ठरवताना प्रथम एएनएस
यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्येष्ठता ठरवण्यात यावी. शैक्षणिक पात्रता समान असेल,
तर वयोमानानुसार ज्येष्ठता ठरवण्यात यावी. ही प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश तुकाराम मुंडे यांच्या कडून देण्यात आले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Health Department | 597 contract nurse permanently maharashtra government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर