Maharashtra Health Department | सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘या’ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Health Department | राज्यात आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीबाबत मागील काही दिवसांपासून अनेक गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कधी कॉलेजचा तर कुठे केंद्र क्रंमाकांचा घोळ झाला होता. तसेच हाॅलतिकीटमध्ये देखील घोळ दिसून आला. अशा अनेक कारणामुळे परीक्षा (Exam group C) पुढे ढकलण्यात येत होती. पण शेवटी परीक्षा घेण्यात आली. तेव्हा देखील परीक्षांत गोंधळ दिसून आला. त्यावेळी उमेदवारांना चुकीचे प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचं निर्दशनास आलं होतं. मात्र, आता पुन्हा परीक्षा होणार आहेत. याबाबत तारीखही जारी करण्यात आलीय. (Maharashtra Health Department)

 

तर, मे.न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचं कळवण्यात आलं होतं.
त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेबाबत (Exam group C) शासनाने परिपत्रक जारी केलं आहे.
शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे.
एकूण 589 उमेदवारांची होणार गट-क (Exam group C) ची परीक्षा पुन्हा होणार आहे.
आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील (Director of Health Dr. Archana Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ला पुणे, लातूर,
अकोला आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Health Department)

 

असं मिळेल प्रवेशपत्र –

 

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली होती अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आलीय. तसेच त्यांचे नोंदणीकृत Email ID.
आणि व्हॉटस-अप मोबाईलवर प्रवेश पत्र पाठवून देण्याची व्यवस्था केली आहे.
असं आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील (Director of Health Dr. Archana Patil) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Maharashtra Health Department | candidates who got wrong question papers of health department maharashtra recruitment will get chance to give reexam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sachin Waze | सचिन वाझेची उलटतपासणी; अनिल देशमुखांबद्दल वाझे जबाबात म्हणाला…

Maharashtra Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी

Crime News | कल्याण : तरुण जोडप्याचा अल्पवयीन बहीण-भावावर बलात्कार