Maharashtra Health Dept Exam | आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Health Dept Exam | नुकतंच महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या (Maharashtra Health Dept Exam) तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यानी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभुमीवर आता विद्यार्थ्यासाठी मोठी बातमी आहे. आरोग्य विभागाची परिक्षेची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 24 ऑक्टोबर (गट क) ची परीक्षा तर (गट ड) साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोेपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत (Maharashtra Health Dept Exam) आज (सोमवारी) दुपारी 2 ते 3 तास बैठक घेण्यात आली.
यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या जाहीर केलेल्या 2 तारखा दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, असंही टोपे म्हणाले.
तर, परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर, यावेळी 9 दिवस आगोदर हॉलतिकीट देण्यात येणार असल्याचं राजेश टोपेंनी (Rajesh Tope) सांगितलं आहे.

पुढे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही.
मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठतात. त्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी.
परीक्षा पारदर्शकच व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असंही टोपे म्हणाले.

Web Title :-  Maharashtra Health Dept Exam | rajesh tope announced mhd exam date 2021 for group c and group d recruitment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या 

Pune News | दत्तवाडी परिसरातील सोसायट्यांतील पाणी पुरवठा विस्कळीत ! महापालिकेवर मोर्चा काढणार – अभिजित बारवकर