आगामी 5 दिवस कोकण सोडून संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट ; हवामान खात्याचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी 5 दिवसांमध्ये राज्यात कोकण विभाग सोडून सर्वत्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवसात, मराठवाडयात पुढच्या 4 दिवसात आणि विदर्भात पुढच्या पाच दिवसात उष्णतेची लाट येणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. दोनच दिवसांपुर्वी हवामान खात्याने राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचे सांगितले होते. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली देखील होती. सध्या तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेला आहे तर अनेक ठिकाणी तापमान 37 पेक्षा अधिक आहे. उष्णतेची लाट येणार असल्याने उष्माघाताच्या त्रासापासुन वाचण्यासाठी आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

राज्यात नागपूरसह विदर्भात अधिक तापमानाची नोंद यापुर्वी झाली आहे. चंद्रपूरमध्ये 41, नागपूरमध्ये 40 आणि सोलापुर आणि औरंगाबादमध्ये 39 तर सोलापूर जिल्हयातील अक्‍कलकोट येथे 38 आणि उस्मानाबाद जिल्हयातील बार्शी येथे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्याच्या तापमानात देखील वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. नागरिकांनी उष्णतेची लाट येणार असल्याने खबरदारी घ्यावे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.