Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Heavy Rain | राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. तर काही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. यानंतर आता राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा (Maharashtra Heavy Rain) इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात पावसाने वेग धरला आहे. मुंबईसह (Mumbai) कोकण (Konkan) भागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे.

 

हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, राज्यात आगामी पाच दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर उर्वरीत राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Heavy Rain)

 

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

दरम्यान, मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड,
हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर,
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे. तर, नंदूरबार, धुळे,
जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

 

Web Title :- Maharashtra Heavy Rain | heavy rain warning in maharashtra orange in
konkan mumbai and yellow alert in pune western maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा