…अन् गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला तक्रारदाराशी संवाद, नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या पुणेकरांना आश्चर्याचा धक्का

पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही कॉल घेतले. यामध्ये एका नागरिकाने सोसायटी परिसरात मोठ्याने गाणी वाजत असल्याची तक्रार केली असता देशमुख यांनी त्यांना आपली तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला सांगतो असे कळवले. थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने पुणेकरालाही आश्चर्याचा धक्का बसला.

काय संवाद झाला:
अनिल देशमुख : हॅलो नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत आहे. आपली काय तक्रार आहे. आपल्या सोसायटीचे नाव काय आहे.
तक्रारदार : अहो साहेब मी सनसिटी जवळील शिवसागर सोसायटी परिसरातून बोलत आहे. आमच्या सोसायटीच्या परिसरात जोरात गाणी वाजत आहे. खूप त्रास होत आहे.
अनिल देशमुख: आपल्या जवळील पोलीस स्टेशनला लगेच तक्रार सांगतो. तुमचं नाव काय?
तक्रारदार: माझ नाव इंद्रनील आपटे आहे.
अनिल देशमुख: या तक्रारीबद्दल आपणास कळवितो आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

पोलीस थकलेत पण हिंमत हारले नाहीत
कोरोनाशी लढताना आमचे 300 च्या आसपास पोलीस कर्मचारी शहीद झाले. गेल्या दहा महिन्यांपासून आमचे पोलीस काम करत आहेत. पोलीस थकले जरूर आहेत. पण हिंमत हारलेले नाहीत. या परिस्थितीतही कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत आहेत. आम्ही आशावादी आहोत की, पुढील वर्ष कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना काम करायचे आहे. तसेच राज्य लवकरच कोरोना मुक्त होईल अशी आशा व्यक्त करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मार्चच्या अधिवेशनात शक्ती कायदा मंजूर करू
महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत वाढत्या घटना लक्षात घेता संबधित आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही शक्ती कायदा आणत आहोत. तो साधारण मार्च महिन्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा आणून मंजूर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

फडणवीसांकडे लक्ष देण्याची गरज नाही
सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे. त्या प्रश्नावर देशमुख म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढ काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही”.