शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील ? भाजपच्या टीकेला HM अनिल देशमुखांचं जबरदस्त उत्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार तेव्हा पुतण्याला नव्हे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची काय काही? कर्तृत्व नसताना उंची नसताना ते हे बोलतात. त्यांनी आपली उंची काय ते आधी पहाव हे सर्वांनाच माहिती आहे ते मोठ्या मोठ्या नेत्यांबाबत असंच काही बोलून आपली उंची वाढवत राहतात अशी अनेक टीकाटिपण्णी देशमुख यांनी केली. गृहमंत्री म्हणाले, कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारनं चांगलं काम केलं आहे. हीच आमची अचिव्हमेंट आहे. आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही – गृहमंत्री देशमुख
देवेंद्र फडणीस यांनी जे आरोप केले आहेत त्यावर बोलताना गृहमंत्री यांनी सांगितलं, की आणि अन्यय नाईक प्रकरणात आमचा तपास सुरू आहे. कोर्टाची परवानगी घेऊन आम्ही तपास करत आहोत. पनवेल नाईक यांची केस चुकीच्या पद्धतीने मागच्या सरकारने दाखवली होती. लवकरात लवकर याची चार्जशीट दाखल करणार आणि कारवाई करणार आहे त्यामुळे आमची कारवाई योग्य आहे. कंगना राणावतबाबत बीएमसीचा निर्णय आहे. त्याच्याशी राज्य सरकारचा संबंध नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि मी माफी मागण्याचा प्रश्नच नाही.

दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे आपली भूमिका मांडली. विरोधी पक्षांना कोरोना वर काम करताना सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षाला आपलं काम करायच आहे. कोरोना काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं आहे.

काय म्हटले होते चंद्रकांत पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी इस्लामपूर मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं होतं. ओबीसी आरक्षणावरून केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारशी माहिती नसल्याचं मी बोललो होतो. मात्र, यावरून राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी माझ्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवारही माझ्याबद्दल बोलले. पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजित यांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडलं होतं. हा इतिहास नाही का? आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील. तसेच मंत्री जयंत पाटील यांना ही पुढील विधानसभा निवडणुकीत पाहूच असं आव्हान त्यांनी दिलं आहे.