शक्ती कायद्यात अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करणार्‍या महिलांवर कारवाईची तरतूद : गृहमंत्री अनिल देशमुख

पोलिसनामा ऑनलाईन – महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता शक्ती कायदा लवकरच लागू करण्यात येणाराय. मात्र, महिला देखील 10 ते 20 वर्षानंतर हेतूपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी करत आहेत. यातील बहुसंख्य तक्रारी या खोट्या असल्याच्या समजतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यामध्ये आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपुरातील बल्लारपुरामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गृहमंत्री देशमुख ( Anil Deshmukh) म्हणाले की, शक्ती कायद्याबाबात लोकांकडून सूचना मागविण्यात आल्यात. त्या सूचना प्राप्त झालेल्या असून लवकर हा कायदा लागू होणाराय.

महिला अत्याचाराच्या घटना अधिक असल्या तरी महिला देखील 10 ते 12 वर्षापूर्वीच्या घटनांचा संदर्भ देत पुरूषांविरोधात तक्रारी करतात. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करत आहेत. अशा अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करतात. अशा महिलांवर देखील कारवाईची तरतूद शक्ती कायद्यामध्ये आहे. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय.

अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ला आणि इतर घटनांची माहिती 3 ते 4 दिवसांपूर्वीच मिळते. समाजमाध्यमांत आता या सर्व गोष्टी सार्वजनिक झालेल्या आहेत. या सर्वाला केंद्र सरकार जबाबदार आहे. अर्णबच्या चौकशीमध्ये आणखी बरीच माहिती समोर येईल. तसेच लवकरच पोलीस भरतीची पक्रिया सुरू केली जाणाराय. हि पोलीस भरती नियमानुसार होणाराय, असेही देशमुख म्हणाले.