SSR Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी CBI ला विचारले – ‘5 महिने झाले, काय सापडले सांगा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यावर्षी 14 जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या मुंबईतील आपार्टमेंटमध्ये फास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूने देशभरातील लोकांना मोठा धक्का बसला होता. एक आनंदी अभिनेता, अशाप्रकारे अचानक जग सोडून जाणे आश्चर्यचकित करणारे होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करून संशय व्यक्त करण्यात आला होता की, कुणीतरी त्याची हत्या केली आहे.

सीबीआय करत आहे सुशांत केसचा तपास
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता आणि त्यांना यामध्ये मर्डरसारखे काही आढळले नाही. मात्र, सुशांतला न्याय देण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू झाली होती आणि फॅन्सने मागणी केली की, मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडून सुशांत प्रकरणाचा तपास करण्यात यावा ज्यातून सत्य समोर येऊ शकते. आता सीबीआयचा तपास सुरू होऊन 5 महिने झाले, परंतु सुशांत प्रकरणात काहीही समोर आलेले नाही. यावरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

गृहमंत्र्यांनी सुशांत प्रकरणावर केली मागणी
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयबाबत सुशांत प्रकरणावर चर्चा केली. त्यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हा तपास सुरू होऊन 5 महिने झाले आणि अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, सुशांतचा मर्डर झाला होता की त्याने आत्महत्या केली होती. त्यांनी म्हटले की, या तपासात सीबीआयला जी सुद्धा माहिती मिळाली आहे, त्याचा खुलासा लवकरात लवकर करावा.

सुशांत प्रकरणात सुरू झाली मोहिम
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात बॉलीवुड माफिया, नेपोटिज्म आणि ड्रग्ज कनेक्शन सारख्या गोष्टी समारे आल्या होत्या. ड्रग्ज कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बॉलीवुडच्या मोठ्या कलाकारांना घेरले आहे, तर बॉलीवुडमध्ये माफिया आणि नेपोटिज्म गँग्जबाबत सोशल मीडियावर मोठा गोंधळ झाला होता. सुशांतच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा नेपोटिज्म डिबेट सुरू झाली आणि यामुळे फॅन्स आणि अन्य चित्रपट प्रेमींनी बॉलीवुडचे सेलेब्स आणि स्टार किड्सला बॉयकॉट सुद्धा केले आहे.