10 वी आणि 12 च्या निकालासाठी 20 दिवस करावी लागणार प्रतीक्षा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे विद्याथ्यार्ंचे नुकसान होत आहे. इयत्ता बारावीचा निकाल आज लागणार अशी चर्चा होती. मात्र हा निकाल 10 जूनला लागणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने निकाल उशिरा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्रा, काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे निकाल उशिरा जाहीर केले जातील असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, एमएसबीएसएचएसईने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली नाही. जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करून निकाल जाहीर केले जातील अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे टप्प्यांमध्ये देशात मार्च ते 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपरही रद्द करण्यात आला होता.

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तपत्रिकांचे काम अद्यापही सुरू असल्याने निकाल रखडल्याचे संकेत मिळाले आहेत. कोरोनाचा महाराष्ट्रातील संसर्ग लक्षात घेता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा जुलैपर्यंत जाहीर होतील असे सांगण्यात येत आहे.तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले.