Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

तुकाराम मुंडे, सुजाता सौनिक, राधिका रस्तोगी, संजीव जयस्वाल, विजय सिंघल आदींचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (दि.2) जारी करण्यात आले आहेत. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (IAS Dr. Chandrakant Pulkundwar) यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यावर साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तुकाराम मुंडे (IAS Tukaram Mundhe) यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे. (Maharashtra IAS Officer Transfer)

 

या अधिकाऱ्यांची झाली बदली (Maharashtra IAS Officer Transfer)

 

1. सुजाता सौनिक (IAS Sujata Saunik) – (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), गृह विभाग (Additional Chief Secretary (Home), Home Department), मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. एस. व्ही.आर. श्रीनिवास (IAS S. V.R. Srinivas) – (1991) एमएमआरडीएचे (MMRDA Commissioner) आयुक्त ते धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती

3. लोकेश चंद्र (IAS Lokesh Chandra) – (1991) बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक ते महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय (CMO Mahavitaran) अधिकारी म्हणून नियुक्ती

4. राधिका रस्तोगी (IAS Radhika Rastogi) – (1995) नियोजन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे

5. आय.ए. कुंदन (IAS I.A. Kundan) – अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

6. संजीव जयस्वाल (IAS Sanjeev Jaiswal) – (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. आशीष शर्मा (IAS Ashish Sharma) – (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग (Urban Development Department), मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

8. विजय सिंघल (IAS Vijay Singhal) – महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक ते बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती

9. अंशु सिन्हा (IAS Anshu Sinha) – (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. अनुप कृ. यादव (IAS Anup Kr. Yadav) – (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग (Women and Child Welfare Department), मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

11. तुकाराम मुंडे – IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग (Department of Marathi Language), मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advt.

12. डॉ. अमित सैनी (IAS Dr. Amit Saini) – (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. चंद्रकांत पुलकुंडवार – IAS (2008) आयुक्त नाशिक महापालिका (Commissioner Nashik Municipality) यांची साखर आयुक्त, पुणे (Sugar Commissioner, Pune) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. डॉ. माणिक गुरसाल (IAS Dr. Manik Gursal) – (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मेरिटाईम बोर्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. कादंबरी बलकवडे (IAS Kadambari Balakawade) –
(2010) आयुक्त कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipality Commissioner) यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. प्रदिपकुमार डांगे (IAS Pradipkumar Dange) – (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण),
पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.

17. शंतनू गोयल (IAS Shantanu Goyal) –
(2012) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. पृथ्वीराज बी.पी. (IAS Prithviraj B.P.) –
(2014) जिल्हाधिकारी, लातूर (Latur Collector)यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. डॉ. हेमंत वसेकर (IAS Dr. Hemant Vasekar) –
(2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

20. डॉ. सुधाकर शिंदे (IAS Dr. Sudhakar Shinde) –
(1997) यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त (Addl BMC Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Web Title :  Maharashtra IAS Officer Transfer | 20 IAS Officers Transfers in Maharashtra, Read Complete List

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा