राज्यात सत्तास्थापनेचे ‘हे’ 4 पर्याय, सर्वकाही राज्यपालांवर ‘अवलंबुन’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता भाजपने सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असून यामुळे काही तासातच याची कोंडी सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली तर दुसरीकडे शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक घेऊन त्यांची रवागनी पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. या भेटीत भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला केला नसल्याची माहिती समोर येत आहे.

हे आहेत सत्तास्थापनेचे पर्याय

1) एकाने माघार घ्यावी
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर ठाम असून दोघांनी एकत्र आल्यास सहज सत्तास्थापन होऊ शकेल
2)अल्पमतातील सरकार
288 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 145 आमदारांची गरज आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार असून त्यांनी अपक्षांसह सरकार बनवल्यास त्यांची संख्या 134 होईल. त्यानंतर बहुमताच्या वेळी विरोधी पक्षाचे 21 आमदार अनुपस्थित राहिले तर बहुमताचा आकडा हा 134 होऊन सरकार सहज तरले जाऊ शकते.
3) शिवसेनेमध्ये फूट
56 आमदार असलेल्या शिवसेनेकडे दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असून 45 आमदार जर फुटून शिवसेनेत गेले तर भाजप सहज सरकार स्थापन करू शकेल. त्याचबरोबर पक्षबंदी कायद्याचा देखील फटका बसणार नसून भाजपने मात्र या सर्वाचा इन्कार केला आहे.
4) नवीन आघाडी
शिवसेनेने जर राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले आणि काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला तर सर्व आमदारांची संख्या हि 154 होणार असून बहुमत सहज सिद्ध होईल.

याच्यापुढे काय ?
जर कोणत्याच राजकीय पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल कोणत्याही एका पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतील. त्यावेळी पहिला पक्ष बहुमत सिद्ध करू शकला नाही तर राज्यपाल दुसऱ्या पक्षाला हि संधी देतील. राष्ट्रपती राजवट लागू होण्याआधी राज्यपाल हि औपचारिकता पूर्ण करणार आहेत.

राज्यातील पक्षीय बलाबल

महाराष्ट्र विधानसभा; कुल सीटें 288, बहुमत 145

भाजपा- 105

शिवसेना- 56

राष्ट्रवादी काँग्रेस – 54

कांग्रेस- 44

अन्य- 29

काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा ?
मिळलेल्या माहितीनुसार,राज्यातील काही काँग्रेस आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी इच्छुक असून नवनिर्वाचित आमदार आणि काँग्रेसचा एक गट या पाठिंब्यासाठी अनुकूल आहे. यासाठी अनेक आमदारांनी दिल्लीवारी देखील केली आहे.

शिवसेना आणि काँग्रेस दोघेही सावधान
एका बाजूला शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर काँग्रेसदेखील आपल्या आमदारांची काळजी घेत आहे. भाजप काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील मोठया प्रमाणात होत सून भाजप आणि शिवसेना आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवत आहेत.

Visit : Policenama.com