Maharashtra Industries Minister Uday Samant | धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाइल पार्क’ उभारणार – उदय सामंत

मुंबई : Maharashtra Industries Minister Uday Samant | धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाईल पार्क’ (Technical Textile Park at Dharashiv) उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (MIDC) समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.
विधानसभा सदस्य राणा जगजीत सिंह पाटील (MLA Rana Jagjit Singh Patil) यांनी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री सामंत म्हणाले की, धाराशिव येथे
टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून के.पी.एम.जी.
या संस्थेमार्फत प्राथमिक व्यवहार्यतेबाबत पडताळणी करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील (Jayant Patil), प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी सहभाग घेतला.
Web Title : Maharashtra Industries Minister Uday Samant A ‘Technical Textile Park’ will be set up at Dharashiv – Uday Samant
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली