Maharashtra Industries Minister Uday Samant | भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Industries Minister Uday Samant | भुसावळ नगरपरिषदेच्या (Bhusawal Municipal Council) हद्दवाढीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर घेण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांनी भुसावळ नगरपरिषदेच्या (Nagar Parishad Bhusawal) हद्दवाढीबाबत शासनाने घ्यावयाचे निर्णय व करावयाची कार्यवाही याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींमध्ये 8 जुलै 2022 रोजीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमामध्ये भुसावळ या नगरपरिषदेचा समावेश आहे. या नगरपरिषदेकरिता प्रभाग रचना झाली असून यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या 14 जुलै 2022 रेाजीच्या पत्रानुसार सदर निवडणूक कार्यक्रम सद्यस्थितीत मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये सदर प्रकरणाबाबत सुनावणी सुरु असल्याने स्थगित करण्यात आला आहे.

Web Title : Bhusawal Municipal Council’s delimitation decision will be taken after local self-government elections – Minister Uday Samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Pune-Pimpri ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

MLA Bachchu Kadu | ‘संजय राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर…’, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंचा खोचक टोला