Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Industries Minister Uday Samant | राज्य शासनाने पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण (Maharashtra Govt Information Technology Policy) १९९८ मध्ये आणले होते. त्यानंतर वेळोवेळी या धोरणात बदल करुन नवीन धोरण आणण्यात आले. येत्या १५ दिवसात नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण आणण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar), संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये राज्यातील छोट्या शहरात आयटी केंद्र उभारण्याबाबतची अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती. मंत्री सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनी यावेळी उत्तर दिले.

मंत्री सामंत म्हणाले की, नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, याचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्राने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण (Maharashtra Govt IT Policy) आणले असले तरी महाराष्ट्राचे आतापर्यंत माहिती तंत्रज्ञान केंद्र (IT Hub) धोरण नाही. कोल्हापूर येथे येणाऱ्या काळात नवीन माहिती तंत्रज्ञान केंद्र (Kolhapur IT Hub) उभारण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. जळगाव (Jalgaon) येथे नावीन्यपूर्ण उद्योगांवर आधारित प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ञ, संबंधित विभाग यांची माहिती तंत्रज्ञान केंद्राबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल.

Web Title : New Information Technology Policy to be introduced in 15 days – Minister Uday Samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune-Pimpri ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate | जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार – डॉ. विजयकुमार गावित

ACB Trap On Police Havaldar | 25 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

Bharti Vidyapeeth | ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी’ विषयावर राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद