Maharashtra Intelligence Department Alert | गुप्तचर विभागाचा अलर्ट ! परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. 4 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) हटवले नाही तर राज्यभरात मनसेकडून आंदोलन (Agitation) करण्यात येईल. दरम्यान राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या (Law and Order) पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला (Preventive Action) सुरुवात केली आहे. यातच गुप्तचर विभागाकडून अलर्ट (Maharashtra Intelligence Department Alert) मिळाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाकडून (Maharashtra Intelligence Department Alert) देण्यात आला आहे.

 

 

कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका-CM

इतर राज्यातील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला (Maharashtra Intelligence Department Alert) मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत.

 

 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा (Aurangabad Public Rally) झाली. सभा घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 अटी (Condition) घातल्या होत्या. मात्र सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर (Organizer Rajiv Jawalikar) व राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Aurangabad CP Nikhil Gupta) यांनी राज ठाकरे यांच्या सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती. सीटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 153अ आणि मुंबई पोलीस कायदा (Mumbai Police Act) अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक गिरी यांची नेमणूक केली आहे.

 

 

 

Web Title :- Maharashtra Intelligence Department Alert | intelligence received reports that people from other states might come to maharashtra to disturb law and order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा